आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लखांब:डबल डेकर मनोरा; खेळाडूंचे मल्लखांबावर द्रोणासन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या राष्ट्रीय खेळाडू संभाजी चव्हाणच्या नेतृत्वाखाली आठ खेळाडूंनी मल्लखांबावर डबल डेकर मनोरा सादर केला. यादरम्यान त्यांनी मल्लखांबावरच द्रोणासन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत या खेळाडूंनी अनेक चित्तथरारक कसरती सादर केल्या. हा डबल डेकर मनोरा असून बाकी खेळाडू द्रोणासन करत आहेत. यात मल्लखांबावर बसलेला खेळाडू संभाजी चव्हाण व आदित्य शिरोळे खांद्यावर बसलेला आहे.

वैयक्तिक गटांमध्ये ९० सेकंदांचा निर्धारित वेळ
मल्लखांब हा प्रेक्षणीय क्रीडा प्रकार आहे. स्पर्धात्मक मल्लखांब वैयक्तिक आणि सांघिक गटांमध्ये खेळला जातो. वैयक्तिक गटांमध्ये खेळाडूला ९० सेकंदांमध्ये मल्लखांबावर जास्तीत जास्त आसने करावी लागतात. सांघिक गटामध्ये सर्व खेळाडू एकत्रितरीत्या मनोरा सादर करतात.

गुरुत्वाकर्षणाविरुद्ध आसनाचे कार्य
पर्वतासन जमिनीवर करतात. मात्र, हे आसन मल्लखांबावार केल्यास त्याचा दुप्पट फायदा होतो. कारण गुरुत्वाकर्षणाविरुद्ध कार्य करताना मल्लखांबावर आसन लावताना दुप्पट ताकद, संतुलन, कस लावावा लागतो.
- प्रशांत जमधाडे, राष्ट्रीय खेळाडू

बातम्या आणखी आहेत...