आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडाबळी:रांजणगावातील चौघांवर हुंडाबळीप्रकरणी गुन्हा ; विवाहितेचा घाटीत उपचारा दरम्यान मृत्यू

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने सतत हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती व सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून ३१ मे रोजी पेटवून घेतले होते. अश्विनी अशोक मिसाळ (२०, रा. रांजणगाव) असे विवाहितेचे नाव असून तिची घाटीत उपचारादरम्यान, ६ जून रोजी प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत अश्विनीच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ७ जून रोजी पती आकाश मगर, सासरे शेषराव मगर, सासू नंदा मगर, दीर वतन मगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपासून अश्विनी (रा. नायगाव-दत्तापूर, ता. मेहकर जि. बुलडाणा) चा आकाश शेषराव मगर (रा. मातमळ, ता. लोणार, जि. बुलडाणा) सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर कामासाठी आकाश आई-वडील, भाऊ व पत्नीला घेऊन वाळूज एमआयडीसीत दाखल झाला. त्याला एका कंपनीत कामही मिळाले. सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून अश्विनीचा सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. तुझ्या आई-वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, प्लॉट खरेदीसाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. या सततच्या त्रासामुळे अश्विनीने ३१ मे रोजी सायंकाळी राहत्या घरात पेटवून घेतले होते. त्यानंतर सासरच्या मंडळीनी अश्विनीला घाटीत दाखल केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे अश्विनीची मृत्यूशी झुंज सुरू असताना सासरच्या मंडळींनी अश्विनीच्या पोटात दुखत असल्याचे खाेटे सांगून दाखल केले. मात्र, माहेरच्या मंडळींनी तत्काळ घाटीत तिची भेट घेतली असता, अश्विनीला पाहून तिच्या आई-वडिलांना घाटीत आल्यानंतर अश्रू अनावर झाले होते. विवाहितेच्या मृत्यूनंतर वडिलांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा उपनिरीक्षक सचिन पागोटे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...