आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम:डीफार्मसी विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाचीच प्रतीक्षा; सोमवारपर्यंत करता येईल नोंदणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औषधनिर्माणशास्त्रच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे. दुसरीकडे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश अर्जासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. डीफार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून ७ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. दरम्‍यान, मुदतवाढीमुळे पुढील प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम असलेल्या डीफार्मसीला प्रवेश दिला जातो.

एकीकडे दहावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्गही सुरू झाले आहेत. दुसरीकडे डीफार्मसीची प्रक्रिया मात्र खोळंबली आहे. फार्मसी काैन्सिलकडून सुरू असलेल्या इन्स्पेक्शनमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. प्रवेश क्षमतेचा तिढा निर्माण झाल्‍यामुळे प्रवेशाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियातर्फे दहा दिवसांपूर्वी परिपत्रक काढून प्रवेश क्षमता गेल्‍या शैक्षणिक वर्षाप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्‍यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळणे अपेक्षित असताना प्रत्‍यक्षात मात्र तसे झाले नाही. डीटीईतर्फे राबवल्‍या जाणाऱ्या प्रक्रियेत डीफार्मसीच्‍या प्रवेश अर्जासाठी ३१ आॅक्टोबर अंतिम मुदत होती. त्‍यात आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. वारंवार मुदतवाढ दिली जात असल्‍याने प्रारूप गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादीसह कॅप राउंड फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले नाही.

तपासणी न झाल्याने प्रक्रिया रखडली
फार्मसी काैन्सिलकडून महाविद्यालयांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात पुन्हा यंदा आलेल्या नवीन महाविद्यालयांतदेखील प्रवेश देण्यास मान्यता द्यावी, असे सांगितले आहे. परंतु, तपासणी पूर्ण झाल्याशिवाय मान्यता न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...