आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी:अखंड उड्डाणपुलासह मेट्रोचा डीपीआर नोव्हेंबरमध्ये मिळणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज ते शेंद्रा अखंड उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन केले जात आहे. त्याकरिता स्मार्ट सिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळाने डीपीआर तयार करण्याचे काम सुरु केले आहे. शहराच्या गतिशिलता आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सप्टेंबरच्या अखेरीस तो मिळू शकेल. तर मेट्रो रेल्वेचा डीपीआर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करुन राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जालना रोडवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीचा वारंवार सामना करावा लागतो. त्यावर पर्याय म्हणून शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा पर्याय शोधण्यात आला. त्यासोबतच मेट्रो रेल्वेच्याही पर्यायाचा विचार केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. वाळूज व शेंद्रा भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आहे. त्यांच्यासह शहरवासीयांना मेट्रोची भविष्यात गरज भासणार आहे. या डीपीआरसाठी महामेट्रोने शहराचे सर्वेक्षण करुन सर्व माहिती गोळा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...