आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:मेट्रोसह वाळूज ते शेंद्रा उड्डाणपुलाचा डीपीआर ; दोन्ही प्रकल्पांना लागणार 8,237 कोटी रुपये

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेट्रो आणि शेंद्रा ते वाळूज उड्डाणपुलासाठीच्या डीपीआरचे सादरीकरण शनिवारी (४ मार्च) स्मार्ट सिटी कार्यालयात करण्यात आले. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या महामेट्रोने या दोन्ही प्रकल्पांचा मिळून ८ हजार २३७ कोटींचा डीपीआर तयार केला आहे.या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प राबवताना केंद्र शासनाच्या काही विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्रांची गरज असून त्यासाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

वर्षअखेरीस या दोन्हीही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले पाहिजे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला डॉ. कराड आणि सावे यांच्याशिवाय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, महामेट्रोचे अधिकारी, विमानतळ प्राधिकरण आणि कँटोनमेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. निओमेट्रोसाठी ४५०० कोटींचा तर शेंद्रा ते वाळूजपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी ३७३७ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.

अखंड उड्डाणपुलासाठी १८ ठिकाणी रँप शेंद्रा ते वाळूजपर्यंतच्या २८ किमीचा उड्डाणपूल छावणी कँटोनमेंट एरियाच्या क्षेत्रात चार किलोमीटरपर्यंत मूळ रस्त्यावरून वाहने जातील तर २४ किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल असेल. या उड्डाणपुलासाठी १८ ठिकाणी रँप असतील. तेथून वाहनचालकांना चढ-उतार करता येईल.

मेट्रोचा प्रस्तावित मार्ग टप्पा क्रमांक १ शेंद्रा एमआयडीसी-चिकलठाणा-सिडको बसस्थानक चौक - आकाशवाणी - क्रांती चौक- उस्मानपुरा - अहिल्याबाई होळकर चौक - रेल्वेस्टेशन. टप्पा क्रमांक २ रेल्वे स्टेशन - अहिल्याबाई होळकर चौक - हॉटेल पंचवटी - महावीर चौक -सीबीएस-मिलकॉर्नर-भडकल गेट-रंगीन गेट-लेबर कॉलनी- गणेश कॉलनी-सलीम अली सरोवर-हिमायतबाग- हर्सूल टी पॉइंट-जळगाव रोडमार्गे सिडको बसस्थानक-मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन.

बातम्या आणखी आहेत...