आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपलचॅलेंज:डॉ. अग्रवाल दांपत्याचे अनोखे ‘कपलचॅलेंज’, कोविड सेंटरमध्ये रुग्ण सेवा देण्याचा संदेश, एक जण आसाम मध्ये तर एक जण हिंगोलीत

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

राज्यात फेसबुकवर चार दिवसांपुर्वी सुरु झालेल्या ‘कपल चॅलेंज’ची चांगलीच धुम पहायला मिळाली. यामध्ये अनेकांनी कपल फोटो फेसबुकवर शेअर केले, मात्र हिंगोलीच्या डॉ. अग्रवाल दांhत्यानेही यामध्ये सहभाग घेत पीपीई कीटमध्ये रुग्ण सेवा देतांनाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे एक जण आसाम राज्यातील दिब्रुगड येेथे तर एक जण हिंगोलीत शासकिय रुग्णालयात कोवीड रुग्णांना सेवा देत आहे. त्यांनी या कपल चॅलेंजमधून रुग्ण सेवा देण्यासोबत त गरजूंना मदतीचा संदेश दिला आहे.

सध्या राज्यभरात कोवीड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पारिचारिका व इतर कर्मचारी दिवसरात्र एक करून कोवीड रुग्णांना सेवा देऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले वाढले आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपुर्वी फेसबुकवर ‘कपल चॅलेंज’ची धुम सुरु झाली. यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला अन आपापल्या जोडीदारा सोबतचे छायाचित्रही झळकवले. यामध्ये मात्र हिंगोलीच्या डॉ. अखील अग्रवाल व त्यांच्या पत्नी डॉ. प्राची अग्रवाल यांच्या ‘कपल चॅलेंज’ने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एम.डी. (मेडीसीन) असलेले डॉ. अखील अग्रवाल हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात कोवीड रुग्णांना आरोग्य सेवा देऊ लागले आहेत. मुंबईत मोठ्या रुग्णालयात गलेलठ्ठ वेतनाची नोकरी सोडून त्यांनी हिंगोली जिल्हयातील रुग्णांना शिक्षणाचा फायदा व्हावा या उद्देशाने ते शासकिय रुग्णालयात रुजू झाले. तर त्यांच्या पत्नी डॉ. प्राची अग्रवाल ह्या आसाम राज्यातील आसाम मेडीकल कॉलेज दिब्रुगड या ठिकाणी भुलतज्ञ या अभ्यासक्रमासाठी प्रवेशीत आहेत. त्यांनी त्या ठिकाणीही कोवीड रुग्णांची सेवा सुरु केली आहे. त्या दोघांनीही पीपीई कीटमधील छायाचित्र सादर करून‘कपल चॅलेंज’मध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांचे हे अनोखे ‘कपल चॅलेंज’ कौतूकाचा विषय ठरू लागले आहे. तर त्यांनी यामध्यमातून एक प्रकारे रुग्ण सेवेचा संदेश दिला आहे.

रुग्णांना मदत मिळणे गरजेचे- डॉ. अखील अग्रवाल, हिंगोली

कोरोना काळात रुग्णांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहेत. या सोबतच नागरीकांनीही त्यांचे कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. कपल चॅलेज व इतर बाबी वरून सोशल मिडीयावर झळकण्या ऐवजी गावातील गरजू रुग्णांना तसेच गरजू व्यक्तींना कशी मदत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...