आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली संस्था येथे यात्री निवास, भिक्खू निवास, प्रसाधनगृह अशा पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत जवळपास १३ कोटींचा निधी देण्यात आला अाहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर येथील १७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत बोलताना दिली
फर्दापूर (ता. सोयगाव) येथे मंगळवारी १७ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन अमेरिकेतील भिक्खू लामा रंगड्रोल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जपानचे भिक्खू ताईजो इमानाका होते. यावेळी संस्थेच्या धम्माचल स्मरणिका व बुद्ध संदेश मासिकाचे प्रकाशन मंत्री अब्दुल सत्तार व मान्यवरांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते शरद दामोदर, माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे यांनी धम्म परिषद यशस्वितेसाठी प्रयत्न केले. यावेळी सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.