आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाला ६६ वर्षे लोटली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसूत्रीतील आजच्या काळात सर्वाधिक सुसंगत कोणता मंत्र आहे? दिव्य मराठी प्रतिनिधीने भडकल गेट येथे अभिवादनासाठी आलेल्या १०० अनुयायांशी याविषयी संवाद साधला असता सर्वांनीच शिक्षणालाच पहिली पसंती दिली. आंबेडकरी समाज शिक्षित नसल्याने समाजाच्या उतरंडीत सर्वात मागच्या पायरीवर राहिला. मात्र, डॉ. बाबासाहेबांच्या या मंत्रामुळे समाजाचे चित्र बदलते आहे. आज वरिष्ठ पदांवर अनेक ठिकाणी आंबेडकरी समाज पोहोचला आहे. आता या समाजाला संघटित होऊन राजकीय स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची गरज असल्याचाही सूर व्यक्त होत आहे.
सुखाचे दिवस दिसत आहेत शिक्षणाची दारे खुली झाल्याने सुख दिसले. शिक्षणालाच महत्त्व आहे. - संगीता जाधव, गृहिणी.
...तरच संघर्ष शक्य शिक्षण हा पाया आहे. शिक्षण घेतले तरच संघर्ष आणि संघटन होऊ शकते. -रेखा दाभाडे, गृहिणी
शिक्षण हे वाघिणीचे दूध त्रिसूत्रीत शिक्षणाला पहिले स्थान आहे. शिक्षणाने सर्वकाही शक्य आहे. - सुप्रिया कांबळे, तरुणी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.