आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन:पदवीधर आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. नरेंद्र काळे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यमान अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदवीधर आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. पदवीधर आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक आमदार विक्रम काळे, पुण्याचे आमदार अरुण लाड यांच्याशी समन्वय ठेवून राज्यातील सुशिक्षित पदवीधरांना पक्षासोबत जोडून घेण्याचे काम आपल्यावर सोपवले असल्याचे डॉ. काळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. त्यांना यापूर्वी डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, हेमंत टकले, बसवराज पाटील, शिवाजीराव गर्जे यांनी डॉ. काळे यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...