आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी डॉ. दिवाण यांची निवड

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २६ वर्षांपासून ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्य चालू आहे. नुकतीच प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा पार पडली. यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. अशोक दिवाण, उपाध्यक्षपदी डॉ. अरविंद देशपांंडे, तर सचिवपदी डॉ.रवींद्र डावरे यांची निवड झाली. यावेळी माजी अध्यक्ष डॉ. अरविंद मुळे, डॉ. शाम जावळीकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी तणाव मुक्तीसाठी हसायनदान कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...