आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक परीक्षण:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 70 % कॉलेजांना ‘नॅक’साठी 149 दिवसांची मुदत

औरंगाबाद / ​​​​​​​डाॅ. शेखर मगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालयांपैकी फक्त २९.५२ टक्क्यांचे ‘नॅक’ मूल्यांकन झाले आहे. विद्यापीठाने मात्र ५२.३७ टक्के कॉलेजचे शैक्षणिक परीक्षण करून घेतले आहे. म्हणजेेच अद्याप ७०.४८ टक्के कॉलेजने ‘नॅक’ केलेले नसून ४७.३३ टक्के कॉलेजचे शैक्षणिक परीक्षण झाले नाही. उर्वरित कॉलेजला ‘नॅक’ करून घेण्यासाठी आता फक्त १४९ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मुदतीत ‘नॅक’ केले नाही तर ७०.४८ टक्के कॉलेजवर संलग्नता गमावण्याचे संकट ओढवणार आहे.

विद्यार्थ्यांना पायाभूत आणि पुरेशा शैक्षणिक सुविधा न देणाऱ्या २३ कॉलेजला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नो अॅडमिशन कॅटेगरीमध्ये टाकले आहे. आत्तापर्यंत ४६४ पैकी २४३ कॉलेजचे परीक्षण करण्यात यश आले आहे. म्हणजेच ५२.३७ टक्के कॉलेजचे मूल्यांकन झाले. अद्याप २२१ कॉलेजचे अर्थात ४७.३३ टक्के कॉलेजचे परीक्षण प्रतीक्षेत आहे. मात्र, आता कॉलेजांसमोर थेट ‘नॅक’ करण्याची अपरिहार्यता आहे.

पण फक्त १३७ कॉलेजचे (२९.५२) ‘नॅक’ झाले. अद्याप ३२७ म्हणजेच ७०.४८ टक्के कॉलेजचे ‘नॅक’ झाले नाही. पुढील सत्रात या कॉलेजांना संलग्नतेसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत ‘नॅक’ करून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आता मोजून १४९ दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत नॅक करून घेतले नाही तर संबंधित कॉलेजचे संलग्नीकरण रद्द केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका कुलगुरू डॉ. येवलेंनी घेतली आहे. १७ ऑक्टोबरला यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘ ३१ मार्च २०२३ पर्यंत नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन केले नाही तर शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये कॉलेजला नो अॅडमिशन कॅटेगिरीमध्ये टाकण्यात येणार आहे. अथवा संलग्नीकरण रद्द करण्यात येईल.’

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १९ कॉलेजचे नॅक पुनर्मूल्यांकन
संलग्नित ज्या १३७ कॉलेजचे नॅक झाले आहे, त्यापैकी ११८ कॉलेज अनुदानित स्वरूपाचे आहेत. त्यात बहुतांश कॉलेज पारंपरिक शिक्षण देणाऱ्या कॉलेजांचा भरणा आहे. १९ कॉलेजचे पुनर्मूल्यांकन आणि मूल्यांकन झाले आहेत. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांचे म्हणजेच इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे १६ कॉलेज आहेत. ३ कॉलेज पारंपरिक अभ्यासक्रमांचे आहेत.

नऊ महिन्यांत ५० पैकी फक्त ११ कॉलेजचे नॅक
कुलगुरूंनी निर्देश दिलेल्या ५० कॉलेजांपैकी फक्त ११ कॉलेजने नॅक केले आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी कुलगुरूंनी ५० कॉलेजचे उद्दिष्ट फेब्रुवारी-२०२२ दरम्यान निश्चित केले होते. त्यात फक्त २२ टक्के यश आले आहे. अद्याप निर्धारित उद्दिष्टांपैकी ७८ टक्के म्हणजेच ३९ कॉलेजचे ‘नॅक’ झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...