आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 9 ऑक्टोबरपासून सुरुवात

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठ परीक्षा 9 ऑक्टो.पासून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आता ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २९ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा सुरू राहतील. पदव्युत्तर पदवी परीक्षांचा निर्णय मात्र सोमवारी घेतला जाईल.

कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांना ब्रेक लागला होता. आता विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक दुसऱ्यांदा जाहीर केले आहे.

मॉक टेस्ट अनिवार्य
त्यानंतर पीआरएन (पर्मनंट रजिस्टर नंबर) क्रमांक युजर आयडी तर जन्मतारीख पासवर्ड राहणार आहे. परीक्षार्थींना काही शंका असल्यास त्यांना https://bamu.unionline.in या लिंकवर चॅटद्वारे शंकांचे निरसन करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...