आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांचा कोर्स करा अन् दरमहा 25 हजारांची नोकरी मिळवा!:विद्यापीठाच्या उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राने सुरू केले 3 कोर्स

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राने 3 नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांत 3 महिने थिअरी आणि 3 महिने संबंधित 10 कंपन्यांत प्रॅक्टिकल करावे लागेल. यातून उद्योजकतेचे कौशल्य देण्यात येईल.

5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल

उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले की, आम्ही 10 कंपन्यांशी आम्ही सामंजस्य करार केला आहे. याच कंपन्यांतून विद्यार्थी आधी इंटर्नशिप करतील. त्यानंतर कंपन्या त्या-त्या इंटर्नचा प्रामाणिकपणा आणि योग्यता पाहून दरमहा किमान 25 हजार रूपये वेतन देतील, असाच कोर्स आम्ही डिझाईन केला आहे. त्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतील. कोर्सचे शुल्क दहा हजार रूपये आहे. तिन्ही कोर्सची प्रवेश क्षमता 90 आहे.

हे कोर्स करता येतील

औरंगाबाद इलेक्ट्रिकल लिमिटेडने (एईएल) एज्युकेशनल सोशल रिस्पॉन्सिबिल्टी (इएसआर) अंतर्गत विद्यापीठाला दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. या फंडातून विद्यापीठाने उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रामार्फत यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून तीन प्रमाणपत्र कोर्स सुरू केले आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॅनेजेरियल स्किल डेव्हलपमेंट अँड एन्थ्रुप्रीनरशीप, सर्टिफिटेक कोर्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंडस्ट्रियल प्रोसेस आणि सर्टिफिकेट कोर्स इन मेकॉट्रॉनिक्स अँड इंडस्ट्री ४.० , असे तिन्ही कोर्ससचे नावे आहेत. सर्व कोर्स सहा महिन्यांचे आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे. हा कोर्स विना अनुदानित स्वरूपाचा असला तरीही सामाजिक आरक्षण लागू राहणार आहे. अधिक माहितीसाठी bamu.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

उद्योजकच करणार मार्गदर्शन.

एईएलचे उपाध्यक्ष डॉ. सोमेन मुजुमदार, एन्डुरन्सचे डॉ. राजेश जावळेकर, एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशनचे मुकुंद कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, एन्डुरन्सचे राम मार्लापल्ले, गरवारेचे व्ही. व्ही. राखुंडे, उद्योजक दिलीप धारूरकर, ऋचा इंजिनिअरिंगचे उमेश दाशरथी, सिग्माचे डॉ. उन्मेष टाकळकर यांच्यासह विद्यापीठातील डॉ. वाल्मीक सरवदे, संगणकशास्राच्या डॉ. भारती गवळी, व्यवस्थापनशास्रचे डॉ. अभिजीत शेळके, भौतिकशास्राचे डॉ. एम. डी. शिरसाट, वाणिज्यचे डॉ. सय्यद अझरूद्दीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतील.

बातम्या आणखी आहेत...