आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरविद्यापीठ स्पर्धा:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाची सर्वाेत्तम खेळी, दुसऱ्यांदा ऑल इंडियाचे तिकीट

सुरत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार निकिताच्या नेतृत्वात महिला संघाचे सलग पाच विजय; आज यजमान संघाविरुद्ध सामना आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता पवारने आपल्या कुशल नेतृत्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महिला संघाने आगामी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला. सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर आपली विजयी माेहीम कायम ठेवताना विद्यापीठाच्या महिला संघाला माेठे यश संपादन करता आले.

आैरंगाबादच्या विद्यापीठाचा महिला खाे-खाे संघ तब्बल २६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आॅल इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला. यासाठी १९९६ मध्ये पहिल्यांदा पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या संघातील सदस्य खेळाडू अनिता पारगावकर यांचे मार्गदर्शन आता माेलाचे ठरले. अनिता पारगावकर सध्या सुरत येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागाच्या आंतरविद्यापीठ खाे-खाे स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षक आहेत.

सलग पाच विजय; प्रवेश निश्चित
प्रशिक्षक पारगावकर यांचे मार्गदर्शन, निकिताचे कुशल नेतृत्व व प्रियंका, पाैर्णिमा, ऋतुजाच्या सर्वाेत्तम खेळीतून संघाची विजयी माेहीम लक्षवेधी ठरली. संघाने स्पर्धेत अहमदाबाद, नागपूर, भाेपाळ, जयपूर आणि पुण्यातील विद्यापीठ संघाविरुद्ध सलग पाच सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. अंतिम चारमध्ये विद्यापीठ महिला संघाचा सामना शनिवारी मुुंबई संघाशी झाला. या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना महिला संघाने बलाढ्य मुंबईला बराेबरीत राेखले. संघाचा आज रविवारी सामना यजमान वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ संघाविरुद्ध होणार आहे.

उस्मानाबादच्या कर्णधाराचे कुशल नेतृत्व; विद्यापीठाचा महिला संघ दुसऱ्यांदा पात्र
उस्मानाबादच्या कर्णधार निकिताने कुशल नेतृत्वातून तब्बल २६ वर्षांनंतर तत्कालीन कॅप्टन सीमा धस यांच्या देदीप्यमान कामगिरीला उजाळा दिला. धस यांच्या नेतृत्वात १९९६ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महिला संघ आॅल इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर आता याच उस्मानाबादच्या निकिताच्या नेतृत्वात विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...