आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरची ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ योजनेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने याची घोषणा केली आहे. देशातील 69 पैकी 35 सेंटर्सचीच निवड झाली आहे. त्यात औरंगाबाद विद्यापीठाचा समावेश आहे. यामुळे मराठवाड्यातील युवकांच्या बिझनेस आयडियांना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडेंच्या कार्यकाळात विद्यापीठाने बजाज इंक्युबेशन सेंटरची स्थापना केली होती. नंतर विद्यापीठाला अटल इन्क्युबेशन सेंटरही मिळाले. आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात ही सेंटर्स उत्तम काम करताहेत. सध्याचे संचालक डॉ. सचिन देशमुख आणि सीईओ अमित रंजन इंक्युबिटर्सला प्रोत्साहन देऊन त्यांच्या आयडिला मूर्त रूप देत आहेत. ‘स्टार्टअप’चे 43 प्रस्ताव आतापर्यंत मंजूर आहेत.
आता जास्तीत जास्त युवकांना नव्या योजनेत बीज भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठीच ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ सुरू करण्यात आले आहे. देशातील 69 अटल इंक्युबेशन पैकी फक्त 35 सेंटर्सची निवड झाली आहे. त्यात विद्यापीठाचीही निवड झाली आहे. मराठवाड्यातील युवकांना इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून आता जानेवारीत अर्ज करता येईल.
स्टार्टअप दोन वर्षांपेक्षा अधिक जुना नसावा
स्टार्टअप्सकडे डीपीआयआयटीची मान्यता असावी. अर्जाच्या वेळी दोन वर्षांपेक्षा अधिक जुना स्टार्टअप नसावा, कोर प्रॉडक्ट, सर्विस किंवा बिझनेस डिस्ट्रिब्यूशन मॉडेलसाठी तंत्रज्ञानाचा आधार असल्यास प्राधान्य दिले जाईल. वेस्ट मॅनेजमेंट, सोशल इम्पॅक्ट, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सौर उर्जा, जल व्यवस्थापन, कृषी, खाद्य प्रक्रिया, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, इंटरनेट ऑफ थिंग्स व आर्टीफिसिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील नाविन्यपूर्ण स्टार्टअपचाही विचार केला जाईल.
एकाच प्रोजेक्टला मिळेल बीज भांडवल
''केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक मदत घेतलेली नसावी. स्टार्टअपमध्ये शेअर होल्डर्सचा हिस्सा अर्ज करताना किमान 51 टक्के असावा. कोणत्याही स्टार्टअपला एकापेक्षा अधिक अर्थसहाय्य दिले जाणार नाही.'' - डॉ. सचिन देशमुख, संचालक, अटल इंक्युबिशन सेंटर
पन्नास लाखांचे कर्ज मिळू शकेल
''बिझनेस आयडिया, प्रोटोटाइप विकसित करणे, उत्पादनाच्या चाचण्या घेणे, प्रत्यक्ष उद्योग किंवा व्यवसायात रूपांतर करण्यासाठी 20 लाखांचे अनुदान दिले जाईल. नंतर स्टार्टअप गुंतवणूकदार, भांडवलदार, व्यावसायिक बँका किंवा वित्तीय संस्थाकडून अर्थसहाय देखील घेऊ शकतील. उद्योगांच्या विकासाठी ५० लाखांचे विना तारण कर्ज मिळू शकेल''- अमित रंजन, सीईओ, अटल इंक्युबेशन सेंटर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.