आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभरणी:समतानगर वाॅर्डात मुलासाठी डॉ. कराडांकडून पायाभरणी, सहकारमंत्री अतुल सावेंनीही दिले उमेदवारीचे संकेत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९५ मध्ये समतानगर वाॅर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी झालेले डाॅ. भागवत कराड पुढे भाजपमध्ये गेले. एकदा उपमहापौर, दोनदा महापौरपद मिळवून खासदार आणि आता थेट देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले. आपल्याच वाटेवर आपल्या मुलाने म्हणजे हर्षवर्धनने चालावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी त्याला समतानगर वाॅर्डातूनच उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी त्यासाठी त्यांनी आतापासूनच पायाभरणी सुरू केली आहे.

गेल्या आठवड्यात डॉ. कराड यांनी समतानगरात एक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात १२०० जणांना जनधन खाते पासबुकाचे वाटप केले. त्या प्रत्येकाला दोन लाखांचा आरोग्य विमा सुरक्षा कवच दिले. माझे राजकीय जीवन समतानगरमधूनच सुरू झाले. त्यामुळे या वाॅर्डाचा सर्वांगीण विकास करू, असा दावाही केला.

मंत्री सावे यांनी केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हर्षवर्धन हे करत असल्याचे सांगून कराडपुत्राच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे गेल्या वेळी याच वाॅर्डातून डाॅ. कराड यांच्या पत्नी डाॅ. अंजली पराभूत झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी भाजपची यंत्रणा घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...