आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती-पुण्यतिथी साजरी:शाळा तपासणीसाठी काढला जातो ड्राॅ

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात हतनूर येथील काही शाळांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या अचानक भेटीदरम्यान शाळांमध्ये महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करत नसल्याचा प्रकार समाेरआला. त्यामुळे विभागीयआयुक्तांच्या कानउघाडणीनंतर जि.प. शिक्षण विभागाने आता शाळा तपासणीसाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करत महिनाभरात २५६ शाळांची तपासणी केली. जिल्ह्यातील शाळांच्या नावाच्या चिठ्ठ्या कर्मचारी एका बरणीत भरतात. त्यानंतर ड्राॅ काढून शाळांची तपासणी केली जाते.

आता शिक्षण विभागाने कुणालाही टार्गेट करून नव्हे, तर सर्वच शाळांची दर आठ दिवसांनी अचानक तपासणी केली जात असून त्यासाठी कोणत्या भागातील तपासणी कधी, केव्हा करायची, यासाठी ड्रॉ काढला जातो. महिनाभरात २५६ शाळांची तपासणी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...