आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सभा:डाॅ. काळे : दुधामध्ये एवढा तोटा का? : राजकारणाने दूध संघ बुडेल

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१५ नंतर दुध संघ तोट्यात चालला आहे. गतवर्षी निवडणुकीपूर्वीचा ३० लाखांचा नफा ९ लाखांपर्यंत कमी का होतो? असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी एवढी वाईट अवस्था पाहू शकत नाही, अशी टीका केली. त्यावर दूध संघाचे अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे यांनी इथं राजकारण कराल तर हा संघ बुडेल, असे प्रत्युत्तर दिले.

दूध संघाची वार्षिक सभा शनिवारी (१० सप्टेंबर) पाटीदार भवन येथे झाली. त्यावेळी डॉ. काळे व बागडे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यावर दूध उत्पादक नंदू जाधव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर डॉ. काळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व मंत्री संदीपान भुमरे, बागडे यांच्या शब्दाला मान देवून मी पॅनल उभे केले नाही. खासगी संस्थांप्रमाणे तुम्ही ३४ रुपये ऐवजी दोन रुपये भाववाढ द्यावी. विषय पत्रिकेतील काही विषय नामंजूर असल्याचेही स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर दूध येणे घटले पण दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, विक्रीत प्रचंड वाढ झाली. असे शिवाजी बनकर, डॉ. काळे म्हणाले. त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट बागडे विषय क्रमांक दोन मंजुर म्हणत होते. तर सभासद नाही म्हणत होते. अनेक शेतकऱ्यांनी सभात्याग केला.

काळेंच्या गावपरिसरातील चार दूध संकलन केंद्रे बंद बागडे म्हणाले की, मराठवाड्यातील हा एकमेव दूध संघ चांगल्या स्थितीत आहे. संघाच्या दूध संकलन केंद्रावरून दुसऱ्या खासगी संस्थांना दूध विक्री होत आहे. डाॅ. काळे यांच्या गावपरिसरातील चार दूध संकलन केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे दूध संकलनात घट झाली. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. कर्जाच्या परतफेडीने नफा घटला.

बातम्या आणखी आहेत...