आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थनीतीवर लेख:डॉ. काटेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“शून्य से शिखर तक’ या मुंबईतील संस्थेने प्रायोजित केलेल्या कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ डॉ. डी.एस. काटे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव आंबेडकर, शांतिदूत सुधीर तारे, फिरदोस श्रॉफ, संस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला सिंग यांची उपस्थिती होती. डॉ. काटे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थनीतीवर अनेक लेख प्रसिद्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून देशाच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प व पाणी नियोजनाविषयी काटे यांनी अभ्यास करून आंबेडकरांच्या विचारांचा वेगळा ठेवा जनतेसमोर आणल्यामुळे त्यांचा हा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...