आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुकरण करावे:डॉ. लखन सिंग यांचे आव्हान, म्हणाले - शेतकऱ्यांनी अधिक व्यवसायभिमुख होणे गरजेचे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगतिशील शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करतात. यशस्वी शेती कशी करावी. तंत्रज्ञानाचा वापर, कमी खर्चात चांगली शेती करणे कसे शक्य आहे, याचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी केल्यास मोठा फायदा होईल. अशी माहिती पुणे अटरी संस्थेचे डॉ. लखन सिंग यांनी दिली.

एमजीएम केव्हीके अंतर्गत शेतकर्‍यांकरिता पळसवाडी व परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर विविध पिक प्रात्याक्षिके राबविली आहेत. त्यामध्ये घन कपाशी लागवड तंत्रज्ञान, तूर, सोयाबीन, मका, लसून, टमाटे, भेंडी पिकातील नवीन वान तसेच माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन व एकात्मिक कीड नियंत्रण प्रात्याक्षिके, मुरघास तंत्रज्ञान महिलांचे श्रम कमी करण्याकरीता फुल तोडणी बॅग, धान्य साठवणूक बॅगचा वापर इ.चा समावेश आहे.

सदरील प्रात्यक्षिक तंत्रज्ञान जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी केव्हीके ने त्यांचे दत्तक गाव पळसवाडी येथे गणेश ठेंगडे यांच्या शेतावर शेतीदिन व रब्बी हंगाम चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अटारी,पुणे चे संचालक डॉ.लाखन सिंग व निजुविडू चे विक्री व्यवस्थापक पवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी पिक प्रात्यक्षीकांबाबत आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. यामध्ये शिरुडी येथील ज्ञानेश्वर डगळे यांनी सांगितले की, शेंद्रीय निविष्ठा व विक्रीतून प्रतिमहिना आठ ते दहा हजार महिना मिळत आहे. तर चापानेर येथील मल्हारराव बोरसे यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करून मातीचा शेसेंद्रीय कर्ब 1% पर्यंत पोहोचवला आहे अशे नमूद केले.

पळसवाडी येथील यादवराव जगताप यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालास बाजार भावापेक्षा अधिक दर देत असल्याचे नमूद केले तर धोंदलगावचे मोसंबी उत्पादक शेतकरी बळीराम नाना वाघ यांनी मोसंबी बागेच्या काटेकोर व्यवस्थापनातून उत्पादन खर्चात बचत करून व बांधावरील निंबू लागवडीतून मिळकतीत वाढ केल्याचे सांगितले शेवटी पुरी येथील तरुण शेतकरी कैलास मोरे यांनी केव्हीकेच्या माध्यमातून मातीपरीक्षण पद्धतीचा अवलंब करून उत्पादनात 10 ते 12 % वाढ केल्याचे नमूद केले तसेच इतर शेतकर्‍यांना सुद्धा माहिती देत असल्याचे सांगितले. त्यानंतर निजुविडू चे विक्री व्यवस्थापक पवार यांनी शेतकर्‍यांना कपाशी घन लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली.

डॉ. लाखन सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी अधिक व्यवसायभिमुख होणे गरजेचे असून नवीन तंत्रज्ञान अवगत करावे. केव्हिके ने केलेल्या कामाबद्दल शेतकऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील संपूर्ण केव्हीके शेतकर्‍यांकरिता दिवसरात्र उपलब्ध असल्याने केव्हीकेला विशेष चेहरा निर्माण झाल्याचे नमूद केले.

तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने शाश्वत मिळकती करिता शेती सोबत शेती पर्यटन, शेंद्रीय निविष्ठा निर्मिती, रेशीम उत्पादन, इ. जोड व्यवसायांचे अवलंब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकरी कंपन्यांचे शेतमाल मूल्य साखळी व गतिमान विपणन प्रक्रियेतील महत्त्व विशद केले. या कार्याक्रमानंतर डॉ. लाखन सिंग यांनी घृष्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी व विंटेज शेतकरी उत्पादक कंपनी येथे भेट दिली व त्यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच डोणगाव ता.गंगापूर येथील के.एस. कृषी पर्यटन केंद्रास भेट देयून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या भेटी दरम्यान एमजीएम गांधेली प्रक्षेत्राचे संचालक श्री. सुदाम पवार यांनी मान्यवरांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर त्यांनी एमजीएम केव्हीकेच्या रानवारा रेडिओ 89.6 आणि प्रक्षेत्रावरील पिक प्रात्याक्षिके व उपक्रमास भेट देण्यात आली. या भेटी दरम्यान ते म्हणाले की, या कृषी विज्ञान केंद्राने कमी कालावधीत उल्लेखनीय वाटचाल केले असून प्रक्षेत्रावरील प्रकल्पांची मूल्य साखळी तयार केली आहे ज्याचा शेतकर्‍यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल. याकरिता त्यांनी केव्हीके टीम व एमजीएम संस्थेचे विशेष कौतुक केले. व भविष्यात शेतकर्‍यांना पिक आधारित ग्रुप तयार करून संबंधित पिकाबद्दल सल्ला द्यावा तसेच महिलांचा शेती संबंधित जोड व्यवसायातील सहभाग वाढविण्याकरिता पती-पत्नी यांना एकत्रित प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी सूचना केली.

या कार्यक्रमास पळसवाडी, शेकापुरी, गोळेगाव, भांडेगाव, ता.खुलताबाद, शिरोडी, चापानेर, ता.कन्नड, पुरी, डोणगाव ता. गंगापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवाजी आवटे, विलास ठेंगडे, बाळकृष्ण ठेंगडे व पळसवाडीतील शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...