आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:डॉ. मनिषा राठोड ठरल्या मिसेस मेडिक्वीन ऑफ महाराष्ट्र, पुण्यात पार पडली स्पर्धा, एक दिवसांसाठी देव केल्यास निसर्गाला अभिप्रेत माणूस निर्माण करणार

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

तुम्हाला एक दिवसांसाठी देव केल्यास तुम्हा काय करणार या प्रश्‍नावर उत्तर देतांना हिंगोलीच्या डॉ. मनिषा राठोड यांनी निसर्गाला अभिप्रेत असलेला माणूूस निर्माण करून मानवातील षडरिपूंचे दमन करून पृथ्वीतलावर सुंदर मनुष्यनिर्मिती करेल या उत्तराने टाळ्यांचा कडकडाट झाला अन डॉ. राठोड मिसेस मेडिक्विन ऑफ महाराष्ट्र जाहिर झाल्या. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात गुरुवारी ता. 15 रात्री हा पुरस्कार देण्यात आला. पुणे येथील कशिश फाऊंडेशनच्या डॉ. प्राजक्ता शहा, डॉ. प्रेरणा कालेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून हॉटेल र्कीड येथे ही स्पर्धा आयोजित केली होती.

प्रमुख पाहूणे म्हणून अभिनेते समीर धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत राज्याभरातील सुमारे 200 पेक्षा अधिक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत 40 महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. त्यांचे सामाजिक कार्य, व्यक्तीमत्व या शिवाय इतर निकष पाहण्यात आले. त्यानंतर रॅपवॉक केल्यानंतर त्यांना प्रश्‍नही विचारण्यात आले. यामध्ये डॉ. मनिषा विशाल राठोड यांना तुम्हाला एक दिवसासाठी देव केल्यास तुम्ही काय कराल असा प्रश्‍न विचारणात आला.

मात्र क्षणाचीही विलंब न लावता डॉ. राठोड यांनी कोविडचा संदर्भात देत एकमेकांना मदत करून माणूसकी जिवंत असल्याचे सांगत प्रत्येक माणसांमध्ये माणुसकी रुजविणार तसेच षडरिंपूंचे दमन करून निसर्गाला अभिप्रेत असलेला माणूस निर्माण करणार असे उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अन त्यांना मिसेस मेडिक्वीन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार जाहिर झाला. त्यांना मानाचा मुकुट,प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल सीमा पवार, प्रिया कुरवाडे, अनिता वेरुळकर, भावना गुंडेवार, माहेश्‍वरी शेवाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...