आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्‍हणून निवड:मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्लेंची निवड

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त सृजन साहित्य पत्रिका, औरंगाबाद, माधव राघव प्रकाशन ताळगाव-पणजी व मनसा क्रिएशन, पणजी-गोवाच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ सप्टेंबर २०२२ रोजी पणजी-गोवा या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्याचे आठवे ग्रामीण साहित्य संमेलन, कराडजवळील उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन यासारख्या अनेक संमेलनांचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. स्वतंत्र रचनात्मक कार्यात लक्ष घालणारे एक संवेदनशील लेखक म्हणून मराठी साहित्य वर्तुळाला त्यांची ओळख आहे. चळवळीचे साहित्यशास्त्र मांडणारे अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. नवोदित लेखकांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे एक आदर्श लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

त्यांची गोवा-पणजी या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...