आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलासागर:डॉ. सुनील जोगींच्या उपस्थितीत उद्या काव्यसंमेलनाचे आयोजन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माँ फाउंडेशनचे संस्थापक, उत्तर प्रदेश सरकारच्या हिंदुस्थानी अकादमीचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध हास्यकवी पद्मश्री डॉ. सुनील जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत कलासागरतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चिकलठाणा एमआयडीसी येथील प्रेसिडेंट लॉन्सवर होणाऱ्या या कविसंमेलनात देशभरातील ख्यातकीर्त कवी सहभागी होणार आहेत.

शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखक असलेले कवी डॉ. सुनील जोगी यांच्यासह इंदूरच्या डॉ. भुवन मोहिनी, हरियाणाचे अनिल अग्रवंशी, उज्जैनचे हिमांशू बवंडर आणि पुण्याचे सुमील साहिल या काव्यसंमेलनासाठी औरंगाबादेत येत आहेत. सन २०२२ ला निरोप देताना या प्रसिद्ध कवींच्या मैफलीचा लाभ औरंगाबादकरांना लाभणार आहे.

कवितेतील हास्यभाव असो वा उपहास भाव असो, शानदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकणारे डॉ. जोगी यांची या संमेलनातील उपस्थिती विशेष लक्षवेधी आहे. सोबतच डॉ. मोहिनी, अग्रवंशी, बवंडर आणि सुमील यांच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील कवितांचा आस्वाद या वेळी घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...