आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:डॉ. प्रमोद येवले 4 वर्षांत झाले 4 विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले शनिवारी (४ फेब्रुवारी) घेणार आहेत. नियमित कुलगुरू असण्याबरोबरच राज्यातील चार विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरूपद सांभाळण्याचा मान त्यांना मिळाला आहे. डॉ. मालखेडे यांचे २८ जानेवारीला निधन झाले होते.

त्यामुळे त्यांचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. डॉ. येवले यांची कुलपतींनी तिथे प्रभारी कुलगुरू म्हणून निवड केली आहे. डॉ. येवले यांनी आतापर्यंत चार विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम केले आहे. त्यात नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. डॉ. आंबेडकर विद्यापीठात १६ जुलै २०१९ पासून नियमित कुलगुरू म्हणून ते कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यामुळे पाचव्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून ते काम करणार आहेत. त्याशिवाय फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रभारी अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

जन्मभूमीत सेवेचा आनंद कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, ‘अमरावती परिसरातच माझे शालेय शिक्षण झाले. बालपणही याच भागात गेले. जन्मभूमी असलेल्या अमरावतीच्या विद्यापीठात सेवेची संधी मिळाली ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मला दिलेल्या संधी बद्दल कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा मी आभारी आहे..!’

बातम्या आणखी आहेत...