आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यभार:डॉ. प्रमोद येवलेंनी स्वीकारले अमरावतीचे कुलगुरूपद

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) स्वीकारली. डॉ. येवले सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नियमित कुलगुरू आहेत. अमरावतीचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडून त्यांनी सकाळी कार्यभार घेतला.

संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे (२८ जानेवारी) अकाली निधन झाले आहे. त्यामुळे कुलगुरूपद रिक्त झाले होते. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तूर्त त्यांनी डॉ. येवले यांच्याकडे अमरावतीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश जारी केले होते. डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडून सकाळी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. येवले यांच्याकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे काही काळ अध्यक्षपदही होते. महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...