आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. रफिक झकेरिया क्रिकेट स्पर्धा:विज्डम अकादमी, कीर्तिकर स्पोर्टस संघ विजयी; अमेय डांगे सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील प्रस्तुत डॉ. रफिक झकेरिया क्रिकेट स्पर्धेत विज्डम क्रिकेट अकादमी, कीर्तिकर स्पोर्टस अ संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अमेय डांगे व सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. पहिल्या सामन्यात विज्डम अकादमीने एनपी अकादमीवर 4 गडी राखून मात केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एनपी क्रिकेट अकादमीने 33.3 षटकांत सर्वबाद 165 धावा उभारल्या. यात सलामीवीर कार्तिक गोहलतने 12 ओम जाधव 6 धावा करुन परतले. समर्थ पुरीने 12 धावा केल्या. मोहतशिमने 56 चेंडूंत 6 चौकार खेचत सर्वाधिक 33 धावा जोडल्या. याहिया खानने 22 चेंडूंत 14 धावा केल्या. त्यानंतर आलेले सागर जाधव, कर्णधार दीपक व सुशांत वर्मा हे तिन्ही फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. यष्टिरक्षक फलंदाज पियुष शेलारेने 31 चेंडूंत 2 चौकारांसह 21 धावा काढल्या. जिब्रन किरमानी 13 धावांवर नाबाद राहिला. विज्डमकडून अमेय गिर्गेने 29 चेंडूंत 3 व ध्रुव ढेकणेने धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात, विज्डमने 1३.4 षटकांत 6 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात यष्टिरक्षक फलंदाज सोहिल तडवीने 30 चेंडूंत 15 सणसणीत चौकार व 3 षटकार खेचत 82 धावांची कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. दुसरा सलामीवीर दक्ष काकडेने फटकेबाजी करत 9 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार लगावत 28 धावा ठोकल्या. ध्रुव ढेकणेने 13 आणि अमेय गिर्गेने नाबाद 18 धावांची विजयी खेळी केली. झैद खानने 2 बळी घेतले.

कीर्तिकरकडून युनिव्हर्सल पराभूत

दुसऱ्या लढतीत कीर्तिकर अकादमीने युनिव्हर्सल अकादमीवर 22 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कीर्तिकने 21.1 षटकांत 95 धावा उभारल्या. यात आर्यन डांगेने 22, साई किरणने 15, अभिषेक दाभाडेने 15 धावा केल्या. युनिव्हर्सलच्या विश्वजीत मर्केंडेने 3 व श्रीवेद राजळेने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात, युनिव्हर्सलचा डाव 15.3 षटकांत 73 धावांवर संपुष्टात आला. अभिषेक इंदापुरेच्या 18 धावा वगळता इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या काढू शकला नाही. आर्यन डांगेने 3 व उदय मोरेने 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...