आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. तुकाराम मुंडे यांच्याकडे मागणी:महिलेच्या मृत्यूस जबाबदार डाॅ. भारुकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात रेजुवेन क्लिनिकमध्ये चुकीच्या व विलंब उपचार पद्धतीमुळे एका महिलेचा नाहक मृत्यू झाला. एका कुटुंबाचा संसार उघड्यावर येऊन मुले आईविना अनाथ झाली आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार डॉ. अनुज भारुका यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विशाल वराळे यांनी आरोग्य आयुक्त डॉ. तुकाराम मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एक महिला गुडघ्याचा त्रास होत असल्याने रेजुवेन क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. डॉक्टर हजर नसल्याने त्यांनी क्लिनिकसमोरील उद्यानात झोकाही खेळला. त्यामुळे महिलेला गुडघ्याशिवाय इतर कुठलाही त्रास व आरोग्याची समस्या नव्हती. मात्र, डॉक्टर आल्यानंतर त्यांना उपचार करून इंजेक्शन दिले. त्यानंतर अवघ्या काही वेळेत ती महिला दगावली. ही गंभीर घटना असून त्याची अद्याप कुठलीच चौकशी झाली नाही. शहरातील बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी. त्यानंतर ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करून पीडिता व तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. तसेच पीडितेच्या मुलांना सरकारने मदत करावी, अशी मागणी वराळे यांनी केली. कायदा काय म्हणतो : भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ नुसार, जो कोणी घाईगडबडीने किंवा निष्काळजीपणाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणेल, जो सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत मोडतो, त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

चुकीचे उपचार नाही, पीएममधून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल ३३ वर्षीय महिला पहिल्यांदाच क्लिनिकमध्ये आली हाेती. खूप वर्षांपासून त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यंाच्यावर चुकीचे उपचार केले नाहीत. त्यांच्या मृत्यूचे कारण पीएम रिपोर्टमधून स्पष्ट होईल. काही राजकीय कार्यकर्ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे चुकीचे आहे. -डॉ. अनुज भारुका, रेजुवेन क्लिनिक.

बातम्या आणखी आहेत...