आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरेंना मका आणि ज्वारीतला फरकही कळत नाही. त्यांना शेतीच कळत नाही. ते शेतकऱ्यांचे दुःख काय समजणार, अशी टीका साेमवारी ठाण्याचे युवा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत केली. पेंग्विन टोळीजवळ गद्दार, खोके, खंजीर या तीन शब्दांशिवाय दुसरे काहीच बोलायला उरलेले नाही, असेही ते म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वतीने नगर परिषद मैदानावर शिंदेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्वस्व संघटनेला दिले.त्यांच्या नेतृत्वात ५० आमदारांनी केलेला हा उठाव जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, युवकांच्या भल्यासाठी केलेला आहे.
त्यांना माफ करणार नाही : अब्दुल सत्तार कुणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरणार असेल तर त्यांना आम्ही माफ करणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आगामी आठ महिन्यांत शेतात जाण्यासाठी मातोश्री पाणंद योजनेतून रस्ते तयार होतील, असा दावा केला.
प्रतिनिधी | सिल्लोड राज्यात गद्दारांचे सरकार फार दिवस चालणार नाही. येथे आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे, असे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड येथील शिवसवांद यात्रेत सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान गद्दारांमुळेच होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पंचनामे झाले का, असा प्रश्न केला. अनेक प्रकल्प इतर राज्यांत पळवल्या जात आहेत. त्यामुळे मराठी तरुण बेकार होत आहेत. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार, उद्धव सेनेचे नेते चंद्रकांत खैरे, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे उपस्थित होते.
तर मी पप्पू नाव स्वीकारण्यास तयार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेेल्या वक्तव्याचा आदित्य यांनी निषेध केला. जबाबदार पदावरील व्यक्तीला असे बोलणे शोभत नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत भरपाई देत असाल तर मी माझे पप्पू हे नाव स्वीकारण्यास तयार आहे, असा दावाही आदित्य यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.