आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारणार:घाटीत शिकलेले डॉ. संजय राठोड आता नवे अधिष्ठाता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या १३ महिन्यांपासून रिक्त असलेल्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. संजय राठोड यांची नियुक्ती झाली आहे. उस्मानाबाद येथून त्यांची बदली झाली आहे. विशेष म्हणजे राठोड यांचे वैद्यकीय शिक्षण घाटीतच झाले असून त्यानंतर काही काळ त्यांनी इथे अध्यापनाचेही काम केले आहे. इथे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया राठोड यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

३० सप्टेंबर २०२१ रोजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या निवृत्त झाल्या होत्या. तेव्हापासून हे पद रिक्त होते. डॉ. वर्षा रोटे या प्रभारी अधिष्ठाता म्हणून काम पाहत होत्या. डॉ. राठोड यांनी सांगितले, १९८३ मध्ये मला एमबीबीएससाठी घाटीत प्रवेश मिळाला होता. १९९१ मध्ये पीजीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर २००२ पर्यत मी इथेच वैद्यकीयच्या मुलांना शिकवले. शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या राठोड उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी नांदेड, धुळे येथेही काम केलेले आहे. ते शुक्रवारी पदभार स्वीकारणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...