आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती समृद्ध पण माध्यमे दुबळी:भुवनेश्वर येथील राष्ट्रीय माध्यम परिषदेच्या परिसंवादात डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केले मत

प्रतिनिधी | औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अधिकाधिक लोकांचे अधिकतम कल्याण करणे प्रसार माध्यमांचीच जबाबदारी आहे. भारतीय संस्कृती समृद्ध आहे. पण त्याचे प्रतिबिंब लोकांपर्यंत घेऊन जाण्यात प्रसार माध्यमे दुबळी ठरत आहेत, असे मत डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केले.

ओरीसाच्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय माध्यम परिषदेच्या 'सांस्कृतिक विविधता व प्रसारमाध्यमे' या सत्रात धारूरकर बोलत होते. गुजरातचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी तथा प्रसिद्ध लेखक डॉ. एस. के नंदा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादत पश्चिम बंगालच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रोफेसर डॉक्टर बिप्लव लाहो चौधरी, चेन्नईच्या अण्णा युनिव्हर्सिटीचे डॉ. आय. अरुल आरम यांनी सहभाग घेतला.

माध्यमांत सांस्कृतिक चैतन्य नाही

डॉ. धारूरकर म्हणाले, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यामधील सांस्कृतिक चैतन्य आपल्या प्रसार माध्यमात दिसून येत नाही. कालिदासाच्या विविध संस्कृत नाटकातील श्रेष्ठ कलात्मक सृजनशीलता आपल्या दुर-चित्रवाणी माध्यमातून प्रकटली पाहिजे. बिप्लव चौधरी, अरुल आरम यांनीही चर्चेत सहभाग घेतला. डॉ. अमृता चक्रवर्ती यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल क्रांतीमुळे फायदा

दुपारच्या सत्रात डिजिटल क्रांतीवर डॉ. धारूरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात मन्वंतर घडवून आले आहे. विशेषतः डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य माणसांना डीबीटी म्हणजे थेट हस्तांतरण तंत्राचा लाभ झाला आहे. या सत्रात हैदराबाद येथील ऑक्सासेन युनिव्हर्सिटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. सत्यप्रसाद, आयसीएसएसआरच्या उपसंचालक डॉ. ऋचा शर्मा, उद्योजक सुधी रंजन मिश्रा यांनी सहभाग घेतला. कोलकत्ता येथील अमिटी युनिव्हर्सिटीच्या डॉ. रोमिका भट यांनी सूत्रसंचालन केले. सिम्पल सुजाता मिश्रा यांनी आभार मानले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र पाढी यांनी सर्व सहभागी वक्त्यांचा शाल, मानचिन्हे देऊन सत्कार केला.

3 दिवसांची परिषद

परिषदेचे उदघाट्न उत्कल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सबिता आचार्य यांनी केले. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया स्टडिजचे निवृत्त संचालक, माजी कुलगुरू तथा मणिपूर येथील प्रोफेसर डॉ. बी. पी. संजय यांचे बीज भाषण झाले. प्रास्तविक डॉ.उपेंद्र पाढी यांनी केले. तीन दिवसांच्या परिषदेत विविध तज्ञ भाग घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...