आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या गण-गटांचा प्रारूप आराखड्यावर एकूण 158 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यावरची गुरुवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरू झाली. औरंगाबाद तालुक्यातील गट-गणांवर सर्वाधिक 84 आक्षेप दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीपूर्वी प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 70 गट आणि 140 गणांसाठी प्रारूप आराखडा तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर 2 ते 8 जून या काळात त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. 8 जून अखेरपर्यंत एकूण 158 आक्षेप प्राप्त झालेत. यामध्ये गटाच्या 131 तर गणांसाठी 27 आक्षेपांचा समावेश आहे.
गटामध्ये सर्वाधिक 66 आक्षेप औरंगाबाद तालुक्यातील, तर गणामध्येही 18 आक्षेप औरंगाबाद तालुक्यातीलच आहेत. दरम्यान, या हरकती व आक्षेपांवर विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज 16 जून रोजी सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. संबंधित आक्षेपधारकांना याबाबत संबंधिक तहसीलदारांद्वारे नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आक्षेपधारकांनी त्यांच्या मूळ अभिलेखासह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी मुळे यांनी सांगितले. या सुनावणी पूर्ण झाल्यावर 27 जूनपर्यंत हा आराखडा अंतिम केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.