आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे दुर्लक्ष:चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळील मुख्य रस्त्याला गटारीचे स्वरूप; चालण्यास जागाच शिल्लक नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना राेडवरील चुन्नीलाल पेट्रोल पंपाकडून एसएससी बोर्डाकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. चोकअप झालेल्या ड्रेनेजचे पाणी ओसंडून वाहात असल्यामुळे या रस्त्यावर पाय ठेवण्याचेही धाडस होत नाही. वन विभाग, फॉरेस्ट कॉलनी, पटेल कॉम्प्लेक्स, उत्तमचंद ठोले जैन छात्रालयातील विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करताना दुर्गंधी, डासांचा त्रास सहन करावा लागताे. दुर्गंधीयुक्त पाणी व खड्ड्यांमुळे या रस्त्यावर नेहमी अपघात घडतात. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

या रस्त्यावर वन विभागाचे कार्यालय असून शेजारीच १०० कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेली फॉरेस्ट कॉलनी आहे. दुसऱ्या बाजूला उत्तमचंद ठोले जैन छात्रालय आहे. रस्त्याच्या शेवटी भाजपचेही कार्यालय आहे. मनपाच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार केला नसल्याने खड्डे पडले आहेत. जवळच चेंबर उघडे पडल्याने त्यात कुणी पडू नये, म्हणून एका काठीला लाल रंगाचे फडके बांधले आहे.

भिंतीसमोर कचरा संकलन आमच्या कॉलनीच्या संरक्षक भिंतीच्या समोरील बाजूला मनपाने कचरा संकलन सुरू केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास व दुर्गंधी येते. त्यामुळे कचरा संकलन बंद करावे. -रंजना पाटील, फॉरेस्ट कॉलनी

रस्ता खोदल्याने घाण पाणी वाहते आधीच रस्ता खराब होता. आता ताे खोदून ठेवला आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पायी चालणे कठीण झाले . मुलांनाही बाहेर जाता येत नाही. -माया काजळे, रहिवासी फॉरेस्ट कॉलनी

खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास
हा रस्ता गेल्या चार वर्षापासून खराब झाला आहे. त्यावर दिवसेंदिवस मोठे खड्डे पडत आहेत. ड्रेनेज कामासाठी खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालणेही कठीण झाले आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
-अनुपकुमार पाटणी, सचिव, उत्तमचंद ठोले छात्रालय

बातम्या आणखी आहेत...