आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवशंकर कॉलनी, राजयोद्धा सर्व्हिसेस कॉर्नरवरील ड्रेनेज चोकअप झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ‘दिव्य मराठी’ने यापूर्वीही २८ जानेवारीला या परिसरातील ड्रेनेज समस्येची बातमी प्रकाशित केली होती. प्रशासनाने टेंडर झाले आहे, काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु ड्रेनेजचे पाणी पुन्हा रस्त्यावर वाहत आहे.
शिवशंकर कॉलनी, राजयोद्धा सर्व्हिसेसशेजारी असलेल्या ड्रेनेजमधून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. दोन दिवसांपासून ओसंडून वाहणाऱ्या ड्रेनेजमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही ड्रेनेजलाइन वारंवार चोकअप होते. मनपा तात्पुरते काम करते. मात्र नंतर स्थिती जैसे थे होते. ‘दिव्य मराठी’ने बातमी प्रकाशित केल्यानंतर मनपाच्या मुख्य अभियंत्यांसह अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली होती. टेंडर झाले आहे, लवकरच समस्या सोडवण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते, परंतु पुन्हा याच परिसरात चोकअप झाल्याने नागरिक वैतागले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पोकळ आश्वासन नको अधिकारी पाहणी करून जातात, परंतु काम करत नाहीत. टेंडर झाले, काम सुरू होईल, असे नुसते आश्वासन आश्वासन देतात. - अजय दहिफळे, रहिवासी
दुकानासमोर साचते पाणी ड्रेनेजचे पाणी दुकानासमोर साचते. त्यामुळे साहित्य खरेदी करणे कठीण होते. लहान मुलांना दुकानावर पाठवता येत नाही. ड्रेनेजची समस्या कायमची सोडवावी. - भानुदास जाधव, रहिवासी
चोकअप काढण्यात येईल शिवशंकर कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यातील ड्रेनेजलाइनचे टेंडर झाले आहे. त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी जेटिंग मशीनद्वारे त्या भागातील चोकअप काढण्यात येईल. - नाना पाटील, वॉर्ड अभियंता, मनपा
ड्रेनेजच्या पाण्यातून जायचे कसे? मुख्य रस्त्यावरच ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने पायी चालायचे कसे, असा प्रश्न पडतो. पायाला हे घाण पाणी लागते. हा रोगांना आमंत्रण द्यायचा प्रकार आहे. - आशा धनगर, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.