आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची मागणी:भानुदासनगर अन् चेतनानगरात वाहते ड्रेनेजचे पाणी; आराेग्याचा प्रश्न ऐरणीवर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भानुदासनगर, चेतनानगर परिसरात विविध ठिकाणी ड्रेनेजचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार ड्रेनेजलाइन चोकअप हाेत असल्याने ही समस्या तत्काळ साेडवावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून हाेत आहे.

भानुदासनगर परिसरातील गल्ली क्रमांक ४ ते ६ मध्ये वारंवार ड्रेनेज चोकअप हाेत असल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहते. विशेष म्हणजे दुर्गा माता मंदिर ते महादेव मंदिर आणि गल्ली नंबर ४ मधील अंगणवाडीसमोरील रस्त्यावरही माेठ्या प्रमाणात ड्रेनेजचे घाण पाणी साचते. या ठिकाणी मनपाचे अधिकारी तात्पुरती स्वच्छता करून निघून जातात. परंतु, नवीन ड्रेनेजलाइन टाकणे किंवा त्याचा व्यास वाढवण्याबाबत कोणतीही भूमिका घेत नाहीत. उल्कानगरी, भगवती कॉलनी येथील ओंकारेश्वर मंदिराशेजारील ड्रेनेजही ओसंडून वाहते. त्याचे कायमस्वरूपी काम करावे. या ठिकाणी मोठी पाइपलाइन टाकून ड्रेनेजची नव्याने कामे करावी, अशी मागणी हाेत आहे.

ड्रेनेजलाइन चोकअप नेहमीची समस्या आमच्या परिसरातील गल्ली नंबर ४ ते ६ आणि अंगणवाडीसमोरील गल्लीत नेहमीच ड्रेनेजलाइन चोकअप होते. मनपा अधिकारी तात्पुरते चोकअप काढून निघून जातात. मनपा प्रशासनाला वारवार निवेदने दिली. परंतु, त्याचा काहीही उपयाेग हाेत नाही. -प्रमोद सदाशिवे

कायमस्वरूपी ताेडगा काढा चेतनानगर, भगवती कॉलनी येथील ओंकारेश्वर मंदिराशेजारी असलेली ड्रेनेजलाइन कायम ओसंडून वाहते. त्यातील पाणी गटारीत व रस्त्यावर जाते. ते प्रशासनाला दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही समस्या कायमची सोडवावी. -विलास जयस्वाल

साफसफाई केली जाते या परिसरात नियमित ड्रेनेजची साफसफाई करण्यात येते. तसेच नागरिकांची तक्रार आल्यानंतर ती समस्या त्वरित सोडवण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या तक्रारी त्वरित कळवाव्यात, त्याचे तत्काळ निराकरण करण्यात येईल. -राजू वाघमारे, उपअभियंता मनपा

बातम्या आणखी आहेत...