आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरांची मागणी:डीआरडीएची इमारत जीर्ण, पावसात दुर्घटनेची शक्यता ; जि.प.चे विविध विभाग स्थलांतरित करण्याची मागणी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत सर्व विभाग एका छताखाली येणार आहे. मात्र, असे असले तरी जुन्या काळात बांधलेली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची ही इमारत जीर्ण झाली असून राहण्यायोग्य नसल्याचे बांधकाम तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे हा विभाग वेळीच या ठिकाणाहून स्थलांतरित करायला हवा, अन्यथा पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील छताचा काही भाग कोसळला होता. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे येथील विभाग दुसरीकडे हलवले. याबरोबरच घाटीसमोरील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची इमारतदेखील जीर्ण झाल्याने इमारतीची बांधकाम तपासणी केली होती. या अहवालात ही इमारत राहण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, कार्यालयासाठी दुसरी इमारत उपलब्ध नसल्याने अद्यापही विभाग याच ठिकाणी आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. या ठिकाणी वारा आणि पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथे आजघडीला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, काम करताना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

अहवालानेच केली अडचण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार होते. परंतु, इमारतीला अडथळा नको म्हणून बांधकाम तपासणी अहवाल राहण्यायोग्य नसल्याचा बनवून घेतला. मात्र, ही इमारत आता जुन्या जि.प.च्या जागेवरच होत असल्याने हा अहवालच अडचणींचा ठरल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...