आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धेत:ड्रीम 11 संघ फोटोग्राफर लीग चॅम्पियन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटोग्राफर संघटनेकडून आयोजित क्रिकेट स्पर्धेत ड्रीम ११ संघाने विजेतेपद पटकावले. पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर अंतिम सामन्यात ड्रमने कला संगम संघावर ७ गड्यांनी विजय मिळवत बाजी मारली.

स्पर्धेत १० संघ सहभागी हाेते. स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरुषोत्तम देशपांडे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कल्याण कान्हेरे, मालिकावीर म्हणून संघा तांगडे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जयंत लाचुरे यांना गौरवण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या संघांना माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गणेश जाधव, किरण दांडे, संदीप आरके, संजय चुबे, विजय पैठणे यांची उपस्थिती होती. यासाठी रखमाजी जाधव व किरण दांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...