आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासबसे पहले तो आप सबको मेरा नमस्कार... औरंगाबाद जिले के सबसे पहले पद्म फेस्टिवल को मुझे बुलाने के लिये बहोत बहोत धन्यवाद… आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे. मी स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी सर्वकाही विसरून गेले. एक लक्ष्य ठेवून काम करा, जगाला विसरून जा. तरच ध्येयावर लक्ष केंद्रित होईल. जे लोक मला पाहून हसायचे किंवा रस्ता बदलायचे तीच माणसं आता माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मागे येतात.
लहानपणी कुस्ती आवडू लागली, तेव्हाच पालकांना सांगितले, मला कुस्तीपटू व्हायचे आहे. त्यांनीही पाठिंबा दिला. पण, आईने स्पष्ट सांगितले होते, ‘कोणताही खेळ खेळण्यास हरकत नाही, पण अभ्यास सोडायचा नाही. कुस्तीवर लक्ष केंद्रित कर, अभ्यास मात्र गरजेचा आहे. खेळ आयुष्याचा आनंद देईल, पण अभ्यास तुला समृद्ध करेल. आम्हा खेळाडूंना पाहून तुमच्यापैकी अनेक जण प्रेरित होतात. पण, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. बेसिक शिक्षण घेणे जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या काळात सोशल मीडिया आणि माध्यमांमुळे खेळांना ग्लॅमर मिळाले आहे. पण, त्या ग्लॅमरच्या झळाळीत ध्येय गाठण्यासाठीचा खडतर प्रवास आपल्याला दिसत नाही.
मोबाइल गेम्स आणि जीवनाचा खेळ : आताची मुलं मोबाइल गेम्सच्या वर्तुळात अडकत आहेत. पण, ताे गेम खूप घातक आहे. आई-वडिलांनी मुलांना दररोज आवर्जून मैदानावर, खेळण्यासाठी किंवा निसर्गात फिरण्यासाठी नेले पाहिजे. खेळासाठी स्वत:च्या शारीरिक क्षमतांसोबतच मानसिक-भावनिक पातळीवरील तयारीही तगडी करावी लागते.
सिनेमांमुळे खेळाबद्दल आकर्षण वाढले : अनेक सिनेमांमुळे खेळाबद्दल आकर्षण वाढले आहे. एका शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत केलेली असते, ती या निमित्ताने समोर येते. आमच्या कुस्तीपटूंवरील चित्रपटही लोकप्रिय झाले. मला अद्याप चित्रपटासाठी विचारणा झालेली नाही.
अंगावर तिरंगा, कानावर राष्ट्रगीत आणि गळ्यात मेडल : आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकणेे ही बाब गौरवाचा क्षण आहे. मैदानावर जेव्हा माझ्या अंगावर तिरंगा देण्यात आला, गळ्यात मेडल घातले होते आणि कानावर राष्ट्रगीत पडत होते तो क्षण अत्युुच्च आनंदाचा होता.
ध्यानधारणा आणि कौशल्यांनाही महत्त्व : कुस्तीसारखा खेळ खेळताना ध्यानधारणेची मदत होते. कुस्ती खेळताना श्वास फुलतो. श्वास फुलला की विचार करण्याची क्षमता संपते. अशा वेळी काही सेकंदांत विचार करून प्रतिस्पर्ध्यावर मात करायची असते. मला ध्यानधारणेची मदत झाली. खेळच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात ध्यानधारणेने मदत होईल. खेळात अटॅक ही माझी स्टाइल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.