आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृतीचे जतन:पायलट होण्याचे स्वप्न पाहणारी शिकते आहे अथर्ववेद, मुलींचे प्रथमच पारायण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुली प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उंचावत असताना अजूनही वेदांचा अभ्यास अन् कर्मकांडापासून दूर आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, मुलींनाही वेदांचा अभ्यास व्हावा तसेच पर्यावरण संवर्धन, वातावरण शुद्धीसाठी प्रथमच ११ ते १८ वयोगटातील मुली दररोज अथर्ववेदातील ४०० मंत्र म्हणत पारायण, महायज्ञ करत आहेत. ५ फेब्रुवारीला पूर्णाहुती होईल. पायलट होण्याचे स्वप्न पाहणारी एक मुलगी अथर्ववेदाचे धडे येथे घेत आहे.

आर्य समाज सरकारवाडा आणि महर्षी पाणिनी कन्या वेद पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारीपासून ११ दिवसीय अथर्ववेद सस्वर पारायण व महायज्ञ एन-४ येथे सुरू आहे. सकाळी ८ वाजेपासून १० पर्यंत तसेच संध्याकाळी दोन तास अशा वेळेत पारायण सोहळा व महायज्ञ होत आहे, असे संचालिका अंजू माने यांनी सांगितले. वेदाचार्य मुकेश पाठक म्हणाले की, अथर्ववेदात ५ हजार ९७७ मंत्र, ७३१ सूक्त, तर २० पाठ आहेत. यज्ञासाठी गायीचे शुद्ध तूप, औषधी वनस्पती आणि असलेली समिधा वापरण्यात येत आहेत. या वेळी वेद पाठशाळेच्या संचालिका अंजू माने, डॉ. प्रतिभा शिंदे यांची उपस्थिती होती.

शालेय शिक्षण घेत वेदाभ्यास गेल्या एक वर्षापासून अथर्ववेदाचा अभ्यास सुरू केला. यासोबतच सहावीचा अभ्यास करत आहे. घरात वडीलही प्रोत्साहन देत आहेत. अथर्ववेदाचे दोन कांड झाले असून यज्ञ, आहुतीतील मंत्रोच्चार पाठ आहेत. - प्रज्ञा सूर्यवंशी, जालना

संस्कृतीचे जतन आवश्यक भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेदांचा अभ्यास करत आहे. अथर्ववेदाचे दोन कांड पूर्ण झाले. भगवद्गीता, अष्टाध्याय, श्लोक पठण करते. भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न ठेवले आहे. - अस्मिता सिंग, बिहार

मुलींनाही वेदांच्या अभ्यासाचा अधिकार आजही मुलींना वेदांचा अभ्यास करण्यास पुढे येऊ देत नाहीत, परंतु आर्य समाजाच्या माध्यमातून वेद पाठशाळा चालवतो. यात मुलींना वेदांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. - अंजू माने, संचालिका

बातम्या आणखी आहेत...