आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरात ड्राइव्ह इन लसीकरण मोहीम सुरू; ​​​​​​​दिव्यांग व बेघर नागरिकांसाठी 7 जूनपासून आठवडाभर विशेष मोहीम

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वाहनातच कोरोनाची लस देण्यात येत आहे.

शहरातील दिव्यांग आणि बेघर नागरिकांसाठी ७ जूनपासून आठवडाभर विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार अाहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण मोहीम सुरू करण्यात अाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. आतापर्यंत शहरातील तीन लाख आठ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आता दिव्यांगाच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लहुजी साळवे केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ८० दिव्यांगांनी लस घेतली आहे.

शहरात मनपाकडे सुमारे तीन हजार दिव्यांगाची नोंद आहे. नोंद झालेले व नोंद नसलेल्या सगळ्या दिव्यांगासाठी सोमवारपासून लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात मिळून नऊ सेंटर दिव्यांगासाठी उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी बेघर व ओळखपत्र नसलेल्या लोकांचेदेखील लसीकरण करण्यात येईल.

प्रतिसाद पाहून कालावधी ठरवणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरणाची सुविधा सुरू अाहे. ४५ वर्षांच्या पुढील व्यक्तींचे पहिल्या टप्प्यात प्रोझोन मॉल येथे लसीकरण करण्यात अाले. येथे कोविशील्ड लस देण्यात येणार आहे. नागरिक आपल्या वाहनाने या ठिकाणी लसीकरणासाठी येऊ शकतात. यासाठी प्रोझोनने सहकार्य केले अाहे. पुणे, मुंबईपाठोपाठ ही माेहीम शहरात सुरू झाली अाहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार मोहिमेचा कालावधी ठरवण्यात येईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...