आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:स्त्री भ्रूण हत्येची शिक्षा भोगून आलेल्या सुदाम मुंडेने पुन्हा सुरू केली प्रॅक्टीस, पोलिसांनी घेतले ताब्यात

परणी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील परळीमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर परत बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आज(6 सप्टेंबर) पहाटे परळीतील नंदागौळ रोडवर असलेल्या मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारुन सुदाम मुंडेला अटक केली आहे.

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम मुंडेची वैद्यकीय पदवी न्यायालयाने कायमपी रद्द केली आहे. तरीही मुंडेने परत प्रॅक्टिस सुरू केली होती. जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज पहाटे पोलिसांनी परळीतील नंदागौळ रोडवर असलेल्या मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला आणि त्याला अटक केले. विशेष म्हणजे, मुंडेचा परवाना रद्द झाल्यामुळे त्याने आपल्या मुलीच्या नावे हे हॉस्पीटल सुरू केले होते आणि स्वतः या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser