आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये ​​​​​​​मासळीची विक्रमी विक्री:दिवसभरात 50 टन पेक्षा जास्त खप; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने उलाढाल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या सुरुवातील मासे खाल्ले, तर वर्षभर निरोगी राहतो असा समज आहे. त्यामुळे मासळी प्रेमी 7 जूनला मोठ्या प्रमाणावर मासोळी खरेदी करतात. शहरातही सेंट्रल नाका, मुकुंदवाडी सह विविध भागांमध्ये मासे विक्री करणारे तसेच खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. मागच्या वर्षी 25 ते 30 टन मासळी विक्री झाली होती. यंदा मात्र 50 टन मासे विक्री झाली आहे. तसेच शहरात जवळपास दीड कोटीची उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले.

मासे खरेदी करणाऱ्यांची वाढली संख्या

जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते. तसेच यानंतरचा काळ माशांचा प्रजननाचा काळ असल्याने मासेमारी पुढील तीन महिने कमी होते. त्यामुळे मासे प्रेमी सात जूनला मासे खरेदी करतात. सध्या शहरात तीन होलसेल विक्रेते असून किमान दोनशे छोटे मोठे व्यापारी विक्रेते मासे विक्री करत आहेत. संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने मासे खरेदी करणाऱ्याची संख्या वाढल्याचे दिसून आले.

कोणत्या माशांना मागणी?

कटला, राऊ, बाम, हलवा सुरमई, मरळ, मिरगल, कोंबडा, आहेर, झिंगा पापलेट, बांगडा, शिंगाडा, यासह 30 पेक्षा जास्त प्रकारचे मासे शहरात विक्रीला आले आहेत. तसेच मुंबईहून येणाऱ्या समुद्राच्या माशांना ही चांगली मागणी असते. सध्या 160 ते 1200 रुपये पर्यंत किंमतीचे मासे विक्री होत आहे.

गोडे पाण्याच्या मासळीला भाव

औरंगाबादमध्ये जिल्ह्यासह हैदराबाद व मुंबई येथून मासे विक्रीसाठी येतात. तलाव नद्यांच्या गोड पाण्याचे माशांमध्ये राहू, कटला, मारगल, बामसह विविध गोड्या पाण्याच्या मासळीला अधिक मागणी आहे. तर मुंबई येथून येणाऱ्या पापलेट, बांगडा, सिंगाडा, झिंगा याना मागणी जास्त दिसली. एकूण बाजारात आलेल्या मासळीपैकी सत्तर टक्के मासळी ही गोड्या पाण्याची, तर तीस टक्के पेक्षा कमी खारे पाणी म्हणजेच समुद्राच्या पाण्यातली मासळी आहे, अशी माहिती ठोक विक्रेते अन्सार शेख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...