आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 मार्चपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश:भांडणातून मजुराने केला दाेन सहकाऱ्यांवर अॅसिड हल्ला

दौलताबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मजुराने दोघांच्या अंगावर अॅसिड फेकल्याची घटना दौलताबाद परिसरात घडली. यात दिवनसिंग जोनवाल, सज्जन बमनावत हे दाेघे जखमी झाले. फतियाबाद गावाजवळ गोकुळ रोडवर असलेल्या तुरटी बनवण्याच्या कारखान्यात आरोपी माधव पांचाळ अनेक वर्षांपासून काम करतो. शनिवारी दिवनसिंग कामावर आला तेव्हा अजय राजपूत, संजय दही त्यांची नेमकीच सुटी झाली होती. त्यावेळी पांचाळने माझे सामान कुठे ठेवले आहे, सांगा असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर भांडणात झाले. तेव्हा पांचाळने रागाच्या भरात कंपनीत वापरल्या जाणारे अॅसिड सज्जन व दिवनसिंगच्या अंगावर टाकले. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले आहे. दरम्यान, आराेपीला पाेलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर १३ मार्चपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...