आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना संसर्गाची भीती:धुळीमुळे डोळे, घशाचे आजार वाढले; रोज 200 रुग्णांची भर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाढत्या धुळीमुळे डोळे आणि घसादुखीचे आजार वाढले आहेत. काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे मनपाच्या आरोग्य विभागाने माहिती घेतली तेव्हा रोज किमान २०० रुग्ण डाेळे आणि घसादुखीची तक्रार घेऊन दवाखान्यात येत असल्याचे समोर आले आहे. धूळ कमी करण्यासाठी मनपाला ३२ काेटींचा निधी मिळाला आहे. तरीही शहरात धुळीचे प्रमाण वाढतच आहे.

शहरात अनेक ठिकाणी रस्ते, दुभाजक, पाइपलाइनची कामे सुरू आहेत. सातारा-देवळाई परिसरात बीड बायपास, उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम चालू आहे. तसेच जी-२० परिषदेनिमित्त मनपाने विकासकामे सुरू केली आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, संभाव्य कोरोना लाटेच्या अनुषंगाने मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मनपा आरोग्य केंद्राकडून खासगी रुग्णालयांशी सतत संपर्क साधला जात आहे. त्यातून सध्या घसा आणि डोळ्यांच्या आजाराचे रुग्णच दाखल होत असल्याचे सांगण्यात आले.

मनपा राबवतेय उपाययाेजना केंद्र शासनाकडून प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र ३२ कोटींचा निधी मनपाला मिळाला आहे. त्यात १६ कोटींचे दुभाजक आणि उर्वरित निधी कारंजे, व्हर्टिकल गार्डनवर खर्च होत आहे. याच कामासाठी जी-२० चे ५ कोटींचे बजेट आहे. तरीदेखील शहरात धुळीचे प्रमाण वाढतच आहे.

बातम्या आणखी आहेत...