आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोय की गैरसोय:बीड बायपासच्या उड्डाणपुलांमुळे रोज लाखभर नागरिकांना करावा लागतोय राँगसाइड प्रवास

औरंगाबाद / फिरोज सय्यदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी शहर नियोजनात उड्डाणपूल बांधण्यात येतात. मात्र, बीड बायपासवरील संग्रामनगर रहिवासी सध्या वेगळाच अनुभव घेत आहेत. तांत्रिक कारणासाठी या पुलाची उंची कमी करून व्हेइकल्ससाठी अंडरपास तयार केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी सध्या मात्र दररोज किमान लाखभर लोकांना राँग साइडने प्रवास करावा लागतो आहे.

बीड बायपासवर संग्रामनगर पुलासमोरील मुख्य रस्त्यावर तयार करण्यात येणाऱ्या पुलामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पुलाखाली तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड वाहनधारकांसाठी सर्व्हिस देणारा ठरतच नाही. सध्या तयार होत असलेल्या पुलाच्या बाजूने किमान पंधरा फूट खोल खोदून रस्ता बनवण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या वरील बाजूच्या सर्व्हिस रोडची उंची वाढली आहे. परिणामी शहरातून आमदार रोज परिसरात जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना किमान दोनशे मीटरच्या जवळपास राँग साइडने जावे लागत आहे किंवा बेंबडे हॉस्पिटलसमोरून अर्धा किमी चक्कर मारून जावे लागत आहे.

तरीही पुलाखालच्या सर्व्हिस राेडवरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोकाही वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी सिग्नल बसवले तरी ट्रॅफिक जामची समस्या कायम राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुलाखालील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून तळे तयार होईल व नागरिकांची अधिकच गैरसोय होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्रास होतोय, मग प्रशासन गप्प का? अधिकारी व ठेकेदाराच्या चुकीमुळे भविष्यात उंचीवरील रस्त्यावरून खड्ड्यातील रस्त्यामार्गे शहराकडे जाताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पद्मसिंग राजपूत, रहिवासी

संपर्कासाठी रस्ता की तोडण्यासाठी? अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी आल्यानंतर नागरिकांचा शहराशी संपर्क तुटेल. सध्या एक लाख नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यास कोण जबाबदार ? यशवंतराव कदम, माजी सरपंच, सातारा

जागेवर येऊन समस्या जाणून घ्याव्या अधिकारी कागदावर नकाशे दाखवत आहेत. त्यांनी स्पॉटवर येऊन लोकांना येथे काय अडचण येतेय हे समजून घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे. अॅड. शिवराज कडू पाटील

पूल कॉन्ट्रॅक्टर फायद्यासाठी आहे का? शासनाने पूल बनवताना ठेकेदाराच्या फायद्यासाठी बनवला आहे की लोकांसाठी, याचे उत्तर द्यावे. कुणाच्या चुकीमुळे हा त्रास सहन करावा लागणार आहे?. सोमीनाथ शिराणे, रहिवासी, सातारा

बातम्या आणखी आहेत...