आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाण्यात नवीन फीडर टाकण्याची मागणी:खंडित वीजपुरवठ्यामुळे  उद्योजकांची वाढली अडचण

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा नगर रोड परिसरातील अनेक वर्षांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने उद्योजक त्रस्त आहेत. अनेकदा महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. उद्योग मंत्र्यांकडे समस्या सांगूनही लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार उद्योजकांनी केली आहे. नगर रोड परिसरातील ३८ उद्योजकांना ज्या फीडरवरून विद्युत पुरवठा केला जातो. त्या फीडरवरून अनेक शेतकऱ्यांनाही विद्युत पुरवठा केला जातो. परिणामी वारंवार फीडर ट्रॅप होऊन वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे उद्योजकांना त्यांची ऑर्डर वेळेत पूर्ण करता येत नाही.

शिवाय एकदा सेटिंग केलेला जॉब पुन्हा नव्याने सेट करावा लागतो. प्रशासनाने उद्योजकांच्या सदरील मूलभूत सुविधेकडे लक्ष द्यावे, अन्यथा हे उद्योग बंद पडतील. तसेच नव्याने उद्योग येणार नाहीत, अशी खंत उद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. या वेळी परिसरातील उद्योजक उपस्थित होते.