आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाच्या धोरणावर फोडले खापर:जाचक अटीमुळे डॉक्टर रुग्णालय उघडण्यापेक्षा कॉर्पोरेट हॉस्पिटलला सेवा देतात - रवी वानखेडकर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज कुठलाही नवीन डॉक्टर, शासनाच्या जाचक अटी, लाल फितीचा कारभार, यामुळे स्वतःचे हॉस्पिटल न उघडता कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटल ला आपली सेवा देण्यामध्ये रुची दाखवत आहे. छोटे व मध्यम दवाखान्यांची व्यवस्था नष्ट झाल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम समाजावर पडतील. त्यामुळे सर्वसामान्य डॉक्टरांचे प्रश्न वेळीच सोडवणे ही काळाची गरज असल्याचे मत आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडकर यांंनी सांगितले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत आयएमएचे अध्यक्ष डॉ.यशवंत गाडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन सोहळा पार पडला. यावेळी कराड यांनी डॉक्टरांच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्र्वासन यावेळी दिले. इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर, आयएमए केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, माजी राज्य सचिव डॉ. मंगेश पाटे, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दयानंद मोतीपवळे यांची उपस्थिती होती.

डॉक्टरांचे हल्ल्या प्रकरणात कारवाई करणार

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.भागवत कराड यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. राईट टू हेल्थ, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध समस्या, मिश्रपॅथी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉक्टरांना दवाखान्याच्या नूतनीकरणाच्या वेळेस येणाऱ्या विविध अडचणीचा आढावा घेऊन त्याबद्दल ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात कठोरात कठोर कायदा करण्याविषयी देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

पाच गावे घेणार दत्तक

डॉ. यशवंत गाडे यांनी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची ग्वाही सभासदांना दिली.तसेच पाच गावे दत्तक घेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. कामाचे विकेंद्रीकरण करून जास्त जास्त सभासदांना विविध कामांमध्ये सामावून घेण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली. या हृद्य सोहळ्याला 250 आयएमए सभासद उपस्थित होते.