आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद-औरंगाबाद विमान सेवा सुरू करून अवघे दोन दिवसही उलटले नाहीत तोवर फ्लाय बिगने 3 जूनचे विमान उड्डाण रद्द केले आहे. औरंगाबाद-हैदराबाद आणि हैदराबाद-औरंगाबाद अशी दोन्ही विमान रद्द करण्यात आली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तांत्रिक अडचणींमुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आली. मात्र, उद्या म्हणजेच चार जून रोजी दोन्ही उड्डाणे होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. औरंगाबाद विमानतळाचा विकास होण्याच्या दृष्टीने एअर कंनेक्टिविटी वाढवण्याकरता मागील काही महिन्यांपासून व्यापारी उद्योजक पर्यटन व्यवसायिक तसेच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते. फ्लाय बिग ही नवी विमान कंपनी मे पासून औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करेल असे संकेत फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री यांनी दिले होते. यानुसार 15 मे पासून फ्लाय बिग हैदराबाद विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा देखील कंपनीने केली होती. यानंतर एक जून पासून विमानसेवा सुरू देखील करण्यात आली. मात्र, तिसऱ्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. विमान उडवण्यासाठी अपेक्षित असलेला संपूर्ण स्टाफ उपलब्ध नसल्याचे कारण सूत्रांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.