आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षी करवसुलीचा विक्रम केलेल्या महापालिकेला या वर्षी आतापर्यंत मालमत्ता करवसुलीत १०० कोटी रुपयांचा आकडा गाठता आला नाही. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच १०० कोटींची वसुली पूर्ण झाली होती. या वर्षी व्याजमाफी नसल्याने वसुलीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. आता वसुलीसाठी फक्त ३० दिवस शिल्लक आहेत. मागील वर्षी पाणीपट्टी आणि मालमत्ता कर मिळून १३६ कोटी रुपये वसूल झाले होते. या वर्षी हा आकडा १०७ कोटी रुपयांपर्यंत येऊन थांबला आहे.
मालमत्ता करावर दर महिन्याला दोन टक्के व्याज लावले जाते. सहा महिने मालमत्ता कर भरण्यास उशीर झाला तर १२ टक्के व्याज भरावे लागते. एका वर्षात २४ टक्के व्याज लागलेले अनेक मालमत्ताधारक आहेत. दरवर्षी नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व्याज माफ केले जाते. त्यामुळे कर भरणाऱ्यांची संख्यादेखील वाढते. या वर्षी व्याजमाफीची ‘अभय’ योजना नसल्याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवर झाला आहे. त्यात या वर्षी पाणीपट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजार झाली. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीलादेखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला. नागरिकांनी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कर निर्धारण, कर संकलन अधिकारी अपर्णा थेटे यांनी केले आहे.
कमी वसुली झाल्याचा अर्थसंकल्पावर होणार परिणाम या वर्षी मालमत्ता कर वसुलीचे ३५० कोटी, तर पाणीपट्टीचे टार्गेट १८० कोटी ठेवण्यात आले आहे. मात्र, यापैकी निम्मीदेखील वसुली झाली नाही. या महिन्यात मनपाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कमी वसुली झाल्याचा परिणाम मनपाच्या अर्थसंकल्पावर होऊ शकते, अशी चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.