आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक:आचारसंहिता लागल्याने रस्त्याची निविदा थांबली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० निमित्त शहरात करण्यात येणारी विकासकामे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे अडचणीत सापडली आहेत. त्यासोबत आता महापालिकेची १०० कोटींच्या रस्त्यांची निविदादेखील थांबवण्यात आली आहे. शासनाकडून नव्याने आदेश आल्यानंतर ही निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. जी-२० साठी राज्य शासनाने मनपाला ५० कोटींचा निधी दिला आहे. त्यासाठी अल्प मुदतीच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र आता ही प्रक्रिया थांबवली आहे.

बातम्या आणखी आहेत...