आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:कोरोना संपल्यामुळे 46 टक्के मुलांची लसीकरणाकडे पाठ ; विद्यार्थ्यांना लस देण्याची सूचना

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे याकडे इतर आजारांप्रमाणेच पाहिले जात असून, कोविड लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बहुतांश नागरिकांनी दुसरा डोसही घेतला नाही. हीच स्थिती शाळा व महाविद्यालयांत पाहायला मिळाली. आरोग्य विभागाच्या वतीने शाळांमध्ये कॅम्प आयोजित करून विद्यार्थ्यांना दोन्ही डोस देण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, मोठ्यांप्रमाणेच विद्यार्थीदेखील लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील ५४.३६ टक्के जणांनी पहिला डोस घेतला असून ४५.६४ टक्के विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. मात्र, १५ ते १७ वयोगटात ४७.४५ टक्के आणि १८ वयोगटातील ६८.९३ टक्के विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असून लस घेणे सर्वांना अनिवार्य केले हाेते. यात शाळांनी शिबिर आयाेजित करावे, असे आवाहन केले हाेते. त्यानुसार १६ मार्चपासून (कॉर्बेव्हॅक्स लस) १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. या वयोगटातील १,३८,२३८ जणांना लस देण्याचे लक्ष्य होते. त्यापैकी १,१८,६४४ जणांनी पहिला डाेस घेतला. हे प्रमाण ८५.८३ टक्के आहे. तर ७५,१५१ जणांनी दुसरा डाेस घेतला. अशा एकूण ५४.३६ टक्के विद्यार्थ्यांनी लस घेतली. १५ ते १७ वयोगटातील २,१३,८०० मुलांचे टार्गेट होते. त्यापैकी १,४४,२१३ जणांनी पहिला डोस घेतला असून, हे प्रमाण ६७.४५ टक्के आहे. तर १,०१,४५६ जणांनी दुसरा डाेस घेतला असून, हे प्रमाण ४७.४५ टक्के आहे. १८ वयोगटातील ३२,२४,७०० तरुणांचे लक्ष्य होते. त्यापैकी २७,९२,६८८ जणांनी पहिला डोस घेतला. हे प्रमाण ८६.६० टक्के, तर २२,२२,८५१ जणांनी दुसरा डाेस घेतला. असे एकूण ६८.९३ टक्के प्रमाण आहे. परंतु, १४,०१,९६६ जणांचे लसीकरण बाकी आहे.

कोरोना अद्याप संपला नाही कोरोना लसीबद्दल उदासीनता दिसते. मात्र, कोरोना संपलेला नाही. त्यामुळे लसीकरण करुन घ्यावे. शाळांमध्ये कॅम्प आयोजि करावा. सध्या मुलांसाठीची लस उपलब्ध आहे. फक्त कोविशील्ड नाही. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी बाकी आहेत, अशा शाळांनी कॅम्प घेऊन लसीकरण करावे. डॉ. अभय धानोरकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी

शाळांनी शिबिर आयाेजित करावे शाळा-महाविद्यालयांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. आतादेखील उर्वरित विद्यार्थ्यांना लस द्यावी. शाळांनी शिबिर आयाेजित करावे. - एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...